शिवसेना ५० वर्षाची झाली , सुवर्ण महोत्सव साजरा झाला ...!!!
प्रबोधनकारांच्या आशीर्वादाने आणि जीवलगांच्या साथीने बाळासाहेबांनी कार्यारंभ केला ...!!!
ऐन उमेदीच्या काळात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात निष्ठावंत अशी जवळजवळ अख्खी एक पिढीच निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरू नये ...!!!
हाच शिवसेनेचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि राहिल ...!!!
मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे ,उलथापालथ झाली ,यातुन शिवसेना ताऊन सुलाखून निघाली आणि अधिक मजबूतीने उभी राहीली ....!!!
याला कारण हा मजबूत आधार स्तंभ आहे आणि असा आधारस्तंभ दुसर्या कुण्या नेत्याला लाभला आहे असे किमान माझ्या तरी माहिती मधे नाही ...!!!
महाराष्ट्र 1 वर आजचा सवाल मधील विचारवंतांच्या चर्चेत शिवसेनचा वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी बराच उहापोह झाला ....!!!
सेनेचा भविष्य काळही अधिक उज्वल असेल असे सर्वांना वाटत आहे ....!!!
शिवसेना उभी आहे ती शिवसैनिकांच्या बळावर ,कुण्या नेत्याच्या पैशावर वा गल्लाभरू कार्यकर्त्याच्या जोरावर नव्हे ...!!!
शिवसैनिक हेच शिवसेनेचे प्राण आहेत आणि ते वगळता सेना असु शकत नाही ...!!!
बाळासाहेबांच्या विचारांना आणि संघटनेला कोटीकोटी प्रणाम आणि शुभेच्छा ...!!!
जय महाराष्ट्र ...!!!
❤❤❤❤❤
_
रवि॑द्र किसनराव झांबरे पाटील
Monday, 20 June 2016
शिवसेना , काल , आज आणि उद्या ही ......!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment