हे दृष्य व अवाढव्य विश्व ज्याच्या पासुन निर्माण झाले , ज्याच्या मुळे व ज्याच्या मध्ये ते जगते व अखेर ज्याच्यातच लीन होते असे मुळ तत्व कोणते ? याचा शोध ऋषी मुनी जन्मभर करत राहिले , ध्यान खोल गेल्यावर अखेर अंतर्यामी आत्मस्वरूपाने स्फुरणार्या स्वयंप्रकाशी चैतन्याचा साक्षात्कार त्यांना झाला .
विश्वाला गतिमान ठेवणारे आणि सजीवांना जीवंत ठेवणारे चैतन्य मुळात एकरूपच आहे असा अनुभव ऋषींना आला .
सर्व विश्वाला अंतर्यामीपणे व्यापणार्या या चैतन्याला " ब्रम्ह " असे म्हणतात . तेच सत्याचे सत्य आहे , तेच शुद्ध अस्तित्व आहे . ब्रम्ह आहे म्हणून सर्व काही आहे .
ब्राह्म अमुक एक नसुन सर्व काही आहे . जेंव्हा काही नव्हते तेंव्हा ब्रम्ह होते , सध्या ही आहे पण जेंव्हा काहीही नाही असे होईल तेंव्हा ही ब्रम्ह जसेच्या तसे असेल ...!!!
कोणतीही मानवी कल्पना तिथपर्यंत पोहचू शकत नाही म्हणून मौन हेच त्याचे सर्वोत्तम वर्णन होय ...!!!
ब्रम्ह कशासारखेच नाही पण कशाहुन वेगळे ही नाही , दृष्य नाही तसे अदृष्य ही नाही . तरी ते शुन्य आहे असे मात्र नाही .
त्याला आरंभ ही नाही व अंत ही नाही , ते वाढत नाही व घटतही नाही , ते अमुक एक वस्तु आहे असे नाही पण ते जिच्या पोटात नाही अशी वस्तु च नाही ....!!!
ते अनादी अनंत एवढेच आपण म्हणु शकतो ...!!!
ॐ पुर्णमद: पुर्णमिदं , पुर्णात्पुर्णमुदच्यते ।
पुर्णस्य पुर्णमादाय पुर्णमेवाव शिष्यते ।।
" ॐ शांती : शांती शांती ..."
No comments:
Post a Comment